कासोदा वार्ताहर – कासोदा येथील पोलीस स्टेशन चे स.पो.नि.सुनिल पवार साहेब यांची पदोन्नती वर धुळे येथे बदली होऊन गेल्यापासून , पी.एस.आय नरेश ठाकरे यांनी कासोदा पोलीस स्टेशन ची धुरा सांभाळली. तर जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली खाते अंतर्गत भडगाव येथील स.पो.नि.रविंद्र काशिनाथ जाधव यांची बदली होऊन , त्यांनी दि. १७ जुलै रोजी कासोदा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला. मी आपले कर्तव्य बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साप्ताहिक विचार वैभव तर्फे गुलाब पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी साप्ताहिक विचार वैभव चे संपादक – राहुल मराठे , उपसंपादक – सागर शेलार , कार्यकारी संपादक – वासुदेव वारे , व पत्रकार दिपक शिंपी उपस्थित होते