Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वारकऱ्यांनी पंढरपूरला येऊ नये : पालकमंत्री यांचे आवाहन

najarkaid by najarkaid
June 19, 2020
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

पंढरपूर.दि.19: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. शासनाच्या निर्देशानुसार परंपरा अबाधित राखत मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. याखेरीज अन्य भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपूरात येऊ नये असे आवाहन पालकमंत्री श्री. भरणे यांनी केले आहे.

कोरोना विषाणू प्रसाराला अटकाव करण्यात पंढरपूर येथील अधिकारी यांनी विविध उपाययोजना करुन उल्लेखनीय यश मिळविले आहे. या ‘पंढरपूर पॅटर्न’ची जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे आज दिल्या.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, दत्तात्रय सावंत, यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे,  नगराध्यक्ष साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल झेंडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर  आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भरणे  म्हणाले,  पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या योग्य नियोजन, कडक अंमलबजावणी,नियमांचे काटेकोर पालन आणि योग्य समन्वय  करुन ‘पंढरपूर पॅटर्न तयार केला आहे. या पॅटर्नमुळे पंढरपूर तालुक्याने कोरोना विषाणूच्या प्रसारावर मात केली आहे. यासाठी शासनस्तरावर अजून काही आवश्यक ती मदत लागली तर उपलब्ध करुन देण्यात येईल. आरोग्य विभागाने अधिकारी कर्मचारी यांची कमतरता भासणार नाही यांची दक्षता घेऊन तात्काळ कार्यवाही करुन कंत्राटी पद्धतीने अधिकारी कर्मचारी यांची भरती करावी. तसेच कंत्राटी आरोग्य सेविकांचे मानधन तात्काळ द्यावे. जिल्ह्यात  कोरोना बाबत करण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत निर्माण होणा-या समस्या स्थानिक पातळीवर सोडवाव्यात तसेच जिल्ह्यात नवीन रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता  संबधितांनी घ्यावी.

शासनाकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या नावावर जमा करावे. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप व विम्याची रक्कम उपलब्ध करुन द्या. शासनाच्या दिलेल्या सूचनंनुसार शाळा सुरु करण्याबाबत योग्य नियोजन करा अशा अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी बैठकीत दिल्या.  यावेळी आमदार  भारत भालके यांनी कोविड रुग्णालयाबात योग्य निर्णय घ्यावा तर  शाळा सुरु होण्यापूर्वी शहरी व ग्रामीण भागातील शाळा तपासून घ्याव्यात असे सांगितले. आमदार  दत्तात्रय सावंत यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे  जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत नियोजन करावे असे सांगितले यावेळी प्रशांत परिचारक यांनी अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप करा असे सांगितले.

यावेळी कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या  विविध उपाययोजनांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी यावेळी दिली .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरा बुद्रुक येथे कोरोना ची एन्ट्री !

Next Post

१८ दिवसांत १८ लाख शिवभोजन थाळ्या तर ३३ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post

१८ दिवसांत १८ लाख शिवभोजन थाळ्या तर ३३ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us