जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास सपशेल अपयशी ठरले म्हणून शासनाने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची काल तात्काळ बदलीचे आदेश काढले. अशा परिस्थिती मध्ये झालेली बदली ही बदली नसून उचलबांगडी असल्याचा सुर निघत आहे. अखेर सामूहिक जबाबदारी निश्चित होत शासनाने डीन, डॉक्टर, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि काल जिल्हाधिकारी यांची बदली करून शासनाने तत्परता दाखवली आहे.आता मात्र नोडल अधिकारी देखील बदल होणे आवश्यक आहे तरच यंत्रणा चांगली काम करू शकते.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील कोविड रुग्णालय येथे वयोवृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने जळगाव जिल्हा प्रशासनाची प्रतिमा राज्यभरात मलिन झाल्याचे पाहायला मिळाले असतांना शासनाने डीन, चार डॉक्टर, व इतर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत तत्परता दाखवली.त्यात जिल्हाधिकारी यांनी डॉ. अविनाश ढाकणे यांची देखील बदलीची चर्चा गेल्या आठवडा भरापासून रंगली होती. अखेर त्या चर्चेला रात्री उशिरा विराम मिळाला व जिल्ह्याला नूतन जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत यांच्या नियुक्तीची शासनाने आदेश काढले.
नोडल अधिकारी बदलने गरजेचं
कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व कोविड रुग्णालयात रुग्णांना सुविधा, उपचार तसेच नियंत्रण ठेवण्याकामी जे नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे ते ‘शो पीस’ ठरले आहे. ते कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत.नोडल अधिकारी नियुक्त असतांना देखील रुग्णांच्या समस्या कायम आहेत.नोडल अधिकारी पुरेसा वेळ देत नसल्याची ओरड आहे. म्हणून आता नोडल अधिकारी बदलवून दुसरे सक्षम अधिकारी यांची नियुक्ती होणे गरजेची आहे.गेल्या आठवड्यात जळगाव येथील शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी दि.रा. लोखंडे यांचा पदभार काढा अशी तक्रार एका सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेच तरी आता नोडल अधिकारी बदलणे अपेक्षित आहे.