जळगाव – येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळुन आल्याप्रकरणी डीन डॉ.भास्कर खैरे, सहाय्य्क प्राध्यापक डॉ. सुयोग चौधरी, कनिष्ठ निवासी डॉ. कल्पना धनकवार या तिघांचे निलंबनाचे आदेश प्रशासनाला नुकतेच प्राप्त झाले आहे.
दोषींवर निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे संकेत आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी कालच दिले होते. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचा अहवाल शासनाला प्राप्त होताच आज डीन डॉ.खैरे यांच्यासह दोन जणांचे राज्यपालांच्या आदेशान्वय उपसचिव सुरेंद्र चानकर यांनी निलंबनाचे आदेश काढले.