जळगाव, : वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाच्या संकट काळात कुणालाही रक्ताची कमतरता भासू नये म्हणून जेष्ठ शुक्ल नवमीचे औचित्य साधून श्री महेश प्रगती मंडळ आणि माहेश्वरी युवा संघटनेतर्फे रविवार, 31 मे रोजी सर्वांसाठी सर्वसमावेशक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रिंगरोडवरील श्री महेश प्रगती मंडळ सभागृहामध्ये सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 7 अशा दोन टप्प्यात हे रक्तदान शिबीर होणार आहे.
या शिबिरात सोशल आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासोबतच सॅनिटायझेशन तसेच कोणतेही संक्रमण आणि बॅक्टेरियल व विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाच्या संपूर्ण आरोग्यविषयक सूचनांचे पालन करीत सर्वत्र स्वच्छता पाळण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे रक्तदानाला पूरक ठरणारा कॉफी/बिस्किट्स असा पूरक अल्पआहारही असेल.
माहेश्वरी समाजबांधव जेष्ठ शुक्ल नवमी ही ‘महेश नवमी ‘ म्हणून साजरी करतात. माहेश्वरी समाजाचा हा उत्पत्ती दिवस असल्याचेही मानले जाते.त्यामुळेच या दिवसाला अधिक महत्त्व असते .आज संपूर्ण देश आणि सर्व समाजही अडचणीत असताना अशावेळी आपली सामाजिक जबाबदारी निभावण्यात माहेश्वरी समाज कधीही मागे राहिला नव्हता आणि आताही राहणार नाही याच भावनेने हे रक्तदान शिबीर घेतले जात आहे.
हे शिबीर सर्वांच्या सहयोग आणि सहकार्यानेच पूर्णत्वास जाणार असून रक्तदानासाठी मोठ्या संख्येने पुढे यावे इतरांनाही सहभागी करून घ्यावे असे आवाहन आयोजकांतर्फे श्री महेश प्रगती मंडळाचे अध्यक्ष शरद कासट आणि सचिव आनंद पलोड तसेच माहेश्वरी युवा संघटनेतर्फे अध्यक्ष राहुल दीपक लढ्ढा, सचिव प्रवीण सोनी आणि प्रकल्प प्रमुख आशिष बिर्ला यांनी केले आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागासाठी आणि अन्य माहितीसाठी मनीष बाहेती (9423187430), निलेश झंवर (9423187353 ), आशिष बिर्ला (9850565198),आनंद पलोड (9890030301), आणि भूषण भुतडा (8087501399) यांच्याशी संपर्क साधावा.