जळगाव, (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील सुरेश हरी महाजन यांच्या शेतात आज सकाळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एस.पाटील यांनी तात्काळ परिसराची पाहणी करत गावकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.उद्यापासून पेट्रोलिंग वाढवण्यात येणार असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याबात वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी यावेळी माहिती दिली.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन, पोलीस पाटील राजेंद्र महाजन, वनरक्षक शिवाजी माळी, वनपाल सुनील पाटील, वनमजूर लखन, कांतीलाल पाटील व नागरिक उपस्थित होते.