धुळे,(प्रतिनिधी)- चाळीसगाव येथे आदिवासी कोळी महासंघ कार्यालय घाट रोड, येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात कोळी बांधवांच्या आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची विंटबना करण्यात आली, त्यामुळे समस्त आदिवासी कोळी समाजातील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने घटनेचा निषेध व्यक्त करत आदिवासी वाल्मिकलव्य सेना महाराष्ट्र राज्य संघटना मार्फत सौ कविता ताई कोळी प्रदेश अध्यक्षा ,रावसाहेब ईशी ,हिरामण कोळी, प्रतिक शिरसाठ, यांच्या हस्ते जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालय धुळे येथे आज दिनांक 29/5/20 रोजी पोलिस जिल्हा प्रमुख धुळे , जिल्हाअधिकारी,यांना निवेदन देण्यात आले व दोषींवर कठोर कारवाई ची मागणी करण्यात आली.