- जामनेर :- सावदा येथून पुण्याला जाणारी उदिता ट्रॅव्हल्सची बस रात्री १० वाजेच्या सुमारास जामनेरपासून चार किलोमीटर अंतरावरील टाकळी गावाजवळ रस्त्याच्या बाजुला खाेदलेल्या खड्ड्यांमुळे उलटली. या अपघातात १३ जण किरकाेळ जखमी झाले अाहेत.जळगाव ते औरंगाबाद मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या बाजुलाच खोदलेल्या खड्ड्यात उदिता ट्रॅव्हल्सची बस उलटली. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, डॉ. जयश्री पाटील, डॉ. चांदा यांनी उपचार केले. घटनास्थळी उपनगराध्यक्ष अनिस भाई, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, नगरसेवक नाजीम पार्टी, बाबुराव हिवराळे, दीपक तायडे, जालमसिंग राजपूत यांनी जखमींना मदत केली.
अपघातातील जखमींचे नावे
या अपघातात सुभाषचंद्र पीडियार (वय ५२, रा. फत्तेपूर), रिना ठाकरे (वय २५, रा. खंडवा), मयूर वाघुळदे (वय २४, रा. भुसावळ), ज्ञानेश्वर देविदास पाटील (वय ३८, रा. पिंपळगाव), अनिल ओंकार परतणे (वय ६०, रा. पुणे), सिमरन नाजमुद्दिन (पुणे), कल्पना सदाशिव तायडे (वय ४६, रा. फैजपूर), सायमा बी. फिरोज खान (वय १३), साजिदबी नइमोद्दीन (वय ३५), तंजीला फिरोज खान (वय ११, सर्व रा. सावदा) दुर्गाबाई पाटील (वय ३४, रा. पिंपळगाव) व योगेश नामदेव महाजन (वय ३६, रा. परजोत) अशा १३ जखमींचा समावेश आहे.