चाळीसगाव(किशोर शेवरे) कोरोना ने सर्वत्र थैमान घातल्याने कोरोना विषाणू चा संसर्ग आपल्या परिसरात होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेसह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी,हे आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना रोखण्यासाठी परिश्रम घेत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी दिनांक 6 मे बुधवार रोजी ग्रामपंचायत प्रशासना तर्फे सेनीटायझर बॉटल चे वाटप करण्यात आले त्यावेळेस पत्रकारांना सुद्धा सिने टायझर बॉटल देण्यात आल्या त्याप्रसंगी सरपंच अशोक आमले, ग्रामसेवक जगदीश पाटील, ग्रा प सदस्य संजय आमले, ग्रा प कर्मचारी रोहिदास आमले, पत्रकार भोजराज आमले, किशोर शेवरे, आशा सेविका संध्या पाटील, प्रतिभा पाटील, लता पाटील, अंगणवाडी सेविका जिजाबाई शिंदे, छाया पाटील,आदि कर्मचारी उपस्थित होते.