चाळीसगाव – प्रतिनिधी, दि 5 रोजी चाळीसगाव येथे पोलीस कवायत मैदानावर कोरोना संसर्ग आजारा अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, मेहुणबारे पोलीस स्टेशन, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, चाळीसगाव शहर वाहतुक शाखेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विशेष पोलीस अधिकारी अशासह 200 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची IMA चाळीसगाव या संघटनेतील डॉक्टर स्मिता मुंदडा अध्यक्ष IMA संघटना चाळीसगाव तसेच डॉक्टर सी.टी पवार, शिरीष पवार, विनय पाटील, लीना पाटील,अजय वाबळे, नितीन पवाणी, नरेंद्र राजपूत, रणजीत राजपूत, सौरभ हरकडी, तण्वी पाटील, किरण मगर, सत्यजित पूर्णपात्रे, हरीश राजांनी, मंदार करमबलकर, अनिकेत पवार, स्वप्नील पाटील, मंगेश वाडेकर, राहुल पाटील, अश्विनी पगारे, आशिष सोनवणे यांचे कडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, शहर पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, स पो नि आशिष रोही, मयुर भामरे, पो उ नि मच्छिंद्र रणमाळे, महावीर जाधव, विजय साठे, ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, स पो नि सुरेश शिरसाठ, पो उ नि अभिजीत लांडे, संपत आहेर, मेहुनबारे सपोनि सचिन बेंद्रे, हेमंत शिंदे, वाहतूक शाखा सपोनि रावसाहेब कीर्तीकर यांच्यासह पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त जवान, होमगार्ड व कर्मचारी उपस्थित होते.