कासोदा – येथील साधना मा.विद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला .
सन.२०१८-१९ साली इयत्ता.१० वी आणि १२वीत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना दि.१० जून२०१९ बुधवारी रोजी साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण विभाग महाविद्यालय कासोदा ता.एरंडोल येथे मार्च २०१९च्या इ.१२ वी आर्ट्स परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु.दिपाली पद्माकर पवार व इ.१२ वी व्यवसाय शिक्षण परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु .संगिता आधार बाविस्कर यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिला जाणारा राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्रत्यकी रू.५००० ज.जि.म.वि.प्र.सह.संस्थेचे संचालक .एस.आर.पाटील सर व वनकोठे- बांभोरी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच उमेश श्रीराम पाटील व समाज कल्याण विभाग तालुका समन्वयक माळी साहेब यांच्या हस्ते देण्यात रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले. तर इ.१० परीक्षेत विद्यालयात व कासोदा केंद्रांत ८७.४० % गुण मिळवून प्रथम आलेली कु. मानसी संजय येवले हिचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुख्याध्यापक जी.के.सावंत यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.एल.थोरात यांनी केले तर आभार बी.जे.बेडसे यांनी मानले ., याचवेळी कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयात
ज.जि.म.वि.प्र.सह.संस्थेचे संचालक .एस.आर.पाटील सर व वनकोठे- बांभोरी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री.उमेश श्रीराम पाटील व समाज कल्याण विभाग तालुका समन्वयक माळी साहेब , प्रा.जि. के.सावंत सर यांच्या हस्ते शाळेच्या पटांगणात
वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पार पडला कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.