दिल्ली – पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे परिणामकारक राजकीय डावपेच या दोन्ही कारणांमुळे भाजपने लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व एतेहासिक यश मिळवले आहे. मात्र, अमित शहा लोकसभेचे सदस्य बनले असून ‘अतिमहत्त्वा’चे मंत्री असू शकतील. त्यामुळे पक्षाचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा याचाही विचार मोदी-शहा यांना करावा लागणार आहे. अमित शहांचे अत्यंत नजीकचे मानले गेलेले भूपेंदर यादव यांचा लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या तसेच पश्चिम बंगालची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे कैलास विजयवर्गीय यांच्या नावावर पक्षाध्यक्षपदासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. जुने जाणते राजनाथ सिंह यांच्याकडे पुन्हा पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाईल, अशीही चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे