जळगाव, (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे मी माझ्या घरीच आहे. सोशल मीडियात फिरत असणाऱ्या जुगाराच्या बातमीशी माझ्या काही एक संबंध नाही. न्यूज पोर्टलवर बातमी प्रसिद्ध झाल्यावर मला याविषयी माहिती मिळाली. यात मला जाणीवपूर्वक अडकवण्यात येत आहे. केवळ त्या वार्डाचा नगरसेवक असल्याने राजकीय विरोधकांकडून सदरची खोटी माहिती पसरवण्यात आली आहे.अशी माहिती भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी दैनिक नजरकैद शी बोलतांना दिली आहे.
मयूर कॉलनीतील घर माझ्या नावावर सुद्धा नाही, मी रात्री त्या घटना स्थळावर सुद्धा नव्हतो तरी देखील अशा खोट्या बातम्या पसरवून माझी बादमनामी करण्याचा हा खोडसाळ पणा आहे असा खुलासा कुलभूषण पाटील यांनी केला आहे.