चाळीसगाव,(प्रतिनिधी)- भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत मोरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भाजपाच्या माजी नगरसेवकारवर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगावातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला आहे. माजी नगरसेवक महेंद्र मोरे कार्यालयात बसले होते. त्याचवेळी अज्ञात तरुणांनी महेंद्र मोरे यांच्या गोळीबार केला, दरम्यान महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
जळगाव गोळीबार प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारमधून पाच जण उतरताना दिसत आहेत. अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधल्याचे दिसत आहे. व्हिडिओत पाचही जणांच्या हातात बंदूक दिसत आहे. त्यांनीच माजी नगरसेवकावर गोळीबार केला. या गोळीबारात मोरे थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. गोळीबार का केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.