जळगाव,(प्रतिनिधी)- निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी संशयित ८ आरोपीपैकी २ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे,शासनाचे नुकसान होईल असे अनधिकृत कृत्य नागरिकांनी करू नये व अवैध वाढू माफियांना थारा देऊ नका असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज ७ रोजी पत्रकारांशी बोलताना केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद भुसावळ येथे आले होते .यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की वाळू माफिया मोटरसायकलने पाळत ठेवत आहे ही बाब धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते. यासाठीच महसूल विभागाने पर्याप्त वाढू उपलब्ध करून देण्यासाठी ९ ठिकाणचे लिलाव आज करीत आहे संपूर्ण परवानगी घेऊन 38 वाळू गट येणार आहेत त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढू साठा उपलब्ध होणार आहे .अधिकृतपणे टेंडर भरून वाळू विकत घ्यावी शासनाला नुकसान होईल असे अनधिकृत कृत्य करू नये अवैध वाळु माफियांना थारा देऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात व हल्ला करणाऱ्या आठ जणांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत तसेच एक डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या तरी दुसऱ्या नंबरचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच वाळू भरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले काही प्रमाणात वाळू माफियांवर रोष दिसून येत आहे व या घटनेत तो तीव्र झालेला आहे ही बाब चिंताजनक आहे तरी पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.