जळगाव,(प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अजय पाटील यांची नुकतीच लोक संघर्ष मोर्चा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी नियुक्ती केली आहे.या नियुक्ती बद्दल संघटनेच्या वतीने अजय पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होतं आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते असलेले अजय पाटील हे युवा नेतृत्व असून अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांच्या कार्यशैलीने आजवर अनेक सामान्य नागरिकांना न्याय मिळाला आहे, जन सामान्यांसाठी त्यांची लढण्याची तळमळ आणि प्रामाणिक पणाची दखल घेऊन संघटनेच्या वाढीसाठी व अन्याय ग्रस्त सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अजय पाटील यांची संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.