जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील एका खाजगी बँकेत नोकरी करणाऱ्या एका विवाहित महिलेशी ओळख वाढवत त्याने जवळीक साधत मैत्री केली व नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. महिला विवाहित असल्याचे माहिती असतांना देखील दोघांनी रजिस्टर मॅरेज केले पण महिलेला घरी नांदण्यास न नेता तिच्यावर वेळोवेळी जळगाव पुणे येथे नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने अत्याचार करणाऱ्या ईश्वर व्यास (जळगाव) याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती अशी की,शहरातील २९ वर्षीय विवाहिता शहरातील एका खासगी बँकेत काम करते दरम्यान ईश्वर व्यास याच्याशी ओळख झाली.त्यावेळी त्याने विवाहितेशी जवळीकता साधून मैत्रीपुर्ण संबंध वाढविले,मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले…. विवाहित असल्याचे महिलेने सांगितले. मात्र, तरी देखील त्याने महिलेशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. याप्रसंगी त्याचे काही नातेवाईक व मित्र यासाठी हजर होते.
विवाहानंतर नांदायला न नेता अत्याचार
विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,लग्नानंतर व्यास याने महिलेला घरी नांदण्यास न नेता २ जानेवारी २०२३ ते ३ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान जळगाव शहरासह व पुणे येथे नेऊन वेळोवेळी महिलेच्या संमतीशिवाय शरीरसंबंध प्रस्थापित केले. सतत तिचा छळ करत फसवणूक केली आहे.त्यावरून ईश्वर व्यास याच्यासह नातेवाईक, मित्र अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.