पाचोरा (वार्ताहर) दि,२- गणितीय कार्ये जलदगतीने करण्यासाठी वापरले जाणाऱ्या अबॅकस शिक्षण प्रणालीची देशस्तरीय स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस पाचोरा आणि सक्षम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस,भडगाव या प्रशिक्षण केंद्राचा विद्यार्थी विराज मंजीत चंदन या चौथीत शिक्षण घेणाऱ्या बालकाने देशभरातील अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत देशातून पहिले येण्याचा विक्रम केला आहे त्याने केवळ चार मिनिटांत शंभर बिनचूक गणिते सोडवण्याचा विक्रम केला असून त्याच्या या यशामुळे पाचोरेकर पालकांसह श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस पाचोरा आणि सक्षम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस,भडगाव प्रशिक्षण केंद्रासह प्रशिक्षक रवींद्र पाटील व सपना शिंदे यांचे देशपातळीवर नाव उंचावले असून प्रशिक्षण केंद्राला देखील ‘बेस्ट सेंटर’ चा बहुमान मिळाला आहे,.
या परीक्षेत भारतातील वेगवेगळ्या दहा राज्यातील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांची प्रादेशिक स्तरावरून निवड झाली होती. सहा मिनिटात १०० गणिते सोडवणे असे या परीक्षेचे स्वरूप होते. संपूर्ण भारतातून अडीच हजार विद्यार्थ्यांना हा मान मिळाला होता.
पाचोरा शहरातील श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह कलासच्या
विराज मंजीत चंदन याच्या या यशाबद्दल त्याला विनर्स ट्रॉफी सह सायकल मिळाली तसेच *’मॅन्स मॅजिशियन’* हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यासाठी त्याला ११,१११/ – रुपयांचे रोख बक्षीस देखील मिळाले .विराज सोबतच क्लासचे अयान असलम पिंजारी या विद्यार्थ्यांने लेव्हल वन मधून चतुर्थ क्रमांक मिळवला आहे तसेच ध्रुवी सचिन पाटील या विद्यार्थिनीने लेव्हल वन मधून आठवा क्रमांक पटकावत क्लासचेच नव्हे तर पाचोरा तालुक्यासह जिल्हा व राज्याचे नाव पूर्ण देशभरात उंचावले आहे. या स्पर्धेत क्लास मधील आयुष पाटील,निर्भय तायडे, आर्यन राजपूत, देवेंद्र राजपूत, देवयानी राजपूत, सिद्धेश पाटील, कार्तिक वाणी, सिद्धांत शार्दुल, अथर्व धामणे ,जान्हवी सोनवणे, सलोनी कोटकर, नक्ष भोसले या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अचूक गणिते सोडवली त्यामुळे त्यांना देखील फायनलिस्ट ची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. क्लासेस या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आणि मास्टर ट्रेनर श्री रविंद्र पाटील आणि श्रीमती सपना शिंदे यांचे पालकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.
गणना साधनाच्या साहाय्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या मूलभूत कार्यांची गणना करण्याव्यतिरिक्त अबॅकस प्रणालीत संख्याची गणना जलदगतीने करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.