नाशिक :- सटाणा तालुक्यातील आराई येथील के.बी.एच विद्यालयाच्या शाळेचा कंपाउंडसाठी आराई येथील भूमिपुत्र तथा MI LIEFSTYLE परिवारातील नेटवर्क उद्योजक श्री किशोर अहिरे सर यांनी 51 हजार रुपयाची देणगी दिली. गावात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात श्री अहिरे सरांच्या हस्ते कंपाउंडचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, आराई येथील हायस्कुल ला कंपाउंड नव्हते. ही समस्या बऱ्याच दिवसापासून होती. अखेर उद्योजक श्री किशोर आहिरे यांनीच ही समस्या सोडविण्यात पुढाकार घेतला.
या भूमिपूजन प्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक श्री माधव काका, विद्यमान सदस्य तथा मा. सरपंच श्री माधव नागू आहिरे, वैद्यकीय सेवक डाॅ श्री गोकुळ आहिरे, विद्यमान सदस्य श्री सुनिल रामदास आहिरे, श्री संजय भामरे, श्री शांताराम आहिरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेब,शिक्षक व विद्यार्थी , तसेच गावकरी, तरूण युवक उपस्थित होते.
श्री किशोर आहिरे यांनी ह्याच विद्यालयातून शिक्षण घेतले आहे, ह्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. श्री किशोर आहिरे यांची गावातील सामाजिक कार्यासाठी सतत मदत असते, त्यांनी आजवर अनेक समाजकार्यात मनमोकळेपणाने भरघोस मदत दिली आहे. शिवस्मारकासाठी एक लाख रुपये, ओमकारेश्वर महादेव मंदिर जिर्णोद्धारासाठी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये मदत दिली. महाशिवरात्री महाप्रसाद, उत्कृष्ट गुणवत्ता यादीतील इयत्ता नववी, दहावीच्या एक ते पाच नंबर ने पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देणे. असे अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. मागील काळात पुरग्रस्तांसाठी सुध्दा श्री आहिरे सरांनी मदत पाठवली होती.
भविष्यात आधिक समाजसेवा करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी श्री अहिरे सर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
तसेच गावातील अत्यंत दुर्बल कुटुंबातील मृत व्यक्ती च्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सर्पणाचा खर्च ही देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.आराई गाव तसेच संपूर्ण पंचक्रोशीत श्री अहिरे सरांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे.
महत्वाच्या अपडेट…
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे अयोध्येत जोरदार स्वागत
रावेरमध्ये दगडफेक ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने वातावरण नियंत्रणात
जळगाव येथे जैन इरिगेशनतर्फे ८० फुटांची श्रीराम यांची प्रतिमा
कारसेवा ; आ.एकनाथराव खडसेनीही ३४ वर्षांपूर्वीची पत्रिका आणली समोर, सोबतच जुने फोटोही केले शेअर
भारत का बच्चा बच्चा…या गाण्यावर शिक्षिका आणि विदयार्थ्यांचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सर्व बँका बंद राहणार का ? काय आहे सत्य
२२ जानेवारीला सुट्टीविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
जळगावात १५ हजार चौरसफुटात भव्य रांगोळीतून साकारले प्रभू श्रीरामाचे चित्र
कार सेवेला गेल्याचा हा घ्या पुरावा ; देवेंद्र फडणवीसांनी ३०वर्षे जुनं वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो केला शेअर
जळगाव जिल्ह्यात आज ८२ मिरवणुका, शोभयात्रा ३३ ; अतिरिक्त पोलीस कुमक तैनात