आयोध्या येथे उद्या दिनांक २२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. मंदिर लोकार्पणाचा हा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य होतं असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण भारत देशात उत्सव साजरा केला जातं असतांना नागपूर येथील एका शाळेतील शिक्षिका व विद्यार्थ्यांचा भारत का बच्चा बच्चा…. जय श्री राम बोले गा… या गाण्यावर व श्री रामाच्या भजनावर जबरदस्त डान्स करतांना दिसत आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
#WATCH | Nagpur, Maharashtra: School students dance on Shri Ram bhajans ahead of the Shri Ram Janmabhoomi Temple Pran Pratishtha ceremony. pic.twitter.com/nMmAX718fl
— ANI (@ANI) January 20, 2024
जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना या मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं असून राम मंदिराचं लोकार्पणाच्या दिवसाची इतिहासात नोंद होणार आहे. देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कारण्यात आले आहे.कोट्यवधी रामभक्तांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. रामभक्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आनंद व्यक्त केला जात आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक डान्स करत आनंद व्यक्त केला आहे. डान्स करतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत एक शिक्षिका आणि विद्यार्थी राम भजनावर डान्स करताना दिसत आहेत. शाळेचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थींनी शाळेच्या हॉलमध्ये उभे आहेत. त्यांच्यासमोर एक शिक्षिका राम भजनावर नाचत आहे. तर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी देखील आपल्या शिक्षिकेचे डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत. शिक्षिकेने श्रीरामांच्या भजनावर अतिशय छान नृत्य केलं आहे. संपूर्ण शाळा या रामभजनात आणि नृत्यात तल्लीन झालेलं दिसत आहे.