जळगाव,(प्रतिनिधी)- संपूर्ण देशभरात लहान मुलांसोबतच्या अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत.दिवसेंदिवस कुठे बलात्कार, लैंगिक छळ तर, कुठे पोर्नोग्राफीसारखी प्रकरणं घडत आहेत. भारतात पॉर्न पाहणे गुन्हा नाही. पण, चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा गुन्हा तर आहेच पण त्यासाठी सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.तरी सुद्धा सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात १९ जानेवारी रोजी नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंदी असतानाही सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला चाइल्ड पोर्नोग्राफीला बंदी असताना यू-ट्यूब व इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या खातेधारकांनी त्यांच्या या खात्याद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ प्रसारित केले. हा प्रकार १५ जानेवारी २०२१ ते १० मे २०२१ दरम्यान घडला. ही बाब लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल दीपक सोनवणे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या नऊजणांविरुद्ध शुक्रवारी १९ जानेवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत देशात काय नियम आणि कायदे आहेत याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
पोर्नोग्राफी म्हणजे लोकांचे नग्न फोटो किंवा अश्लील व्हिडीओ (Nude Video) दाखवले जाणे…हे फोटो किंवा व्हिडीओ अनेकदा लैंगिक क्रिया दाखवत तयार केले जातात. अशा प्रकारचे हे व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर असतात.तर चाइल्ड पोर्नोग्राफी हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये मुलांना आमिष दाखवून त्यांना ऑनलाइन संबंधांसाठी तयार करणे, त्यानंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणे किंवा मुलांशी संबंधित लैंगिक क्रिया रेकॉर्ड करणे, एमएमएस बनवणे, ते इतरांना पाठवणे इत्यादी गोष्टीही या अंतर्गत येतात. चाइल्ड पोर्नोग्राफीत १८वर्षांखालील मुलांना टार्गेट केलं जातं.
भारतीय कायद्यानुसार चाइल्ड पोर्नोग्राफी तयार करणे आणि शेअर करणे बेकायदेशीर आहे. याशिवाय चाइल्ड पॉर्न कंटेंट ठेवणे आणि पाहणे हाही गुन्हा आहे. POSCO कायदा 2012 च्या कलम 14 आणि 15 मध्ये असे नमूद केले आहे की चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी कोणत्याही मुलाचा वापर केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. यासह, आयटी कायद्याच्या कलम 67B अंतर्गत, कोणत्याही प्रकारची लहान मुलांसंबंधित न्यूड कंटेंट बाळगणे, ब्राउझ करणे, डाउनलोड करणे, जाहिरात करणे किंवा शेअर करणे बेकायदेशीर आहे.
गुन्हा आणि शिक्षेची तरतूद…
- भारतीय दंड संहिता, 1860 : भारतातील सर्वात जुन्या दंड संहितेत बाल लैंगिक शोषण आणि बाल पोर्नोग्राफीला गुन्हेगार ठरवते.
- कलम 354, 354A, 354B, 354C आणि 376AB नुसार बाल लैंगिक शोषण आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा देण्यात आली आहे.
- बालहक्क (सुधारणा) कायदा, 2019 : हा कायदा भारतातील सर्व मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्यात बालकांचे लैंगिक शोषण, चाइल्ड पोर्नोग्राफी यासारख्या गुन्ह्यांसाठी कायदे आहेत.
- बाल कामगार (प्रतिबंध) कायदा, 2016 : बालकांना श्रमापासून मुक्त करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. बालमजुरी, बाल लैंगिक शोषण आणि बाल पोर्नोग्राफी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये मुलांचा वापर करणार्यांच्या विरोधात हा कायदा आहे.