जळगाव,(प्रतिनिधी)- हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिहं यांच्या स्मृतिदिना निमित्त व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अमर शहीद सुप्रिमो स्व. सुकदेवसिहं गोगामेडी यांच्या स्मरणार्थ आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी कुसुबां येथील हॉटेल प्राईम गार्डनच्या जवळ ‘भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या (खान्देश)दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यध्यक्ष प्रविणसिहं पाटील यांनी केले आहे.
यांनी केले आयोजन
श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यध्यक्ष प्रविणसिहं पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी,जय शंभु नारायण ग्रुपचे शैलेशअप्पा ठाकरे,न्यू रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर व जि. एम. फाउंडेशन चे डॉ. रितेश पाटील,आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्रसिह पाटील यांनी संयुक्तरित्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खान्देश विभाग अध्यक्ष विलाससिहं राजपूत परिश्रम घेत आहेत.