पाचोरा, दिनांक १८ (प्रतिनिधी ): शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माहेजी- कुरंगी बांबरूड गटातील शेकडो तरूणांनी पक्षप्रवेश करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली आहे. वैशालीताईंच्या जनसंपर्क मोहिमेला उदंड प्रतिसाद लाभत असतांना ठिकठिकाणी शाखांचे उदघाटन सुरू असून यातच हा प्रवेश सोहळा झाल्यामुळे सदर परिसरात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगावमध्ये झंझावात निर्माण केला असून त्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधत आहेत. यातच प्रत्येक गावांमध्ये ठिकठिकाणी शाखा देखील उघडण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शाखा उदघाटनांच्या कार्यक्रमांमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिक आणि त्यात देखील विशेष करून तरूणाई त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे. या अनुषंगाने माहेजी-कुरंगी बांबरूड गटात भव्य प्रवेश सोहळा पार पडला.
यात माहेजी येथील येथे ईश्वर समाधान बडगुजर, भावेश कैलास बडगुज,र ज्ञानेश्वर यशवंत शिंपी, देवेंद्र सुधाकर बडगुजर, शुभम नामदेव बडगुज र गणेश एकनाथ बडगुजर, मुकेश सुनील बडगुजर, किशोर फुलचंद बडगुजर पवन गजानन बडगुजर, बंटी कैलास बडगुजर, आजम शांताराम बडगुजर, गणेश दिनकर बडगुजर परेश भानुदास बडगुजर, हर्षल सुपडू पाटील, योगेश रमेश बडगुजर, नारायण रघुनाथ ठाकूर, गौरव आनंदा अहिरे, अविनाश पुंडलिक अहिरे, गजानन शामराव बडगुजर, एकनाथ शामराव बडगुजर, राहुल गोकुळ बडगुजर, शशिकांत एकनाथ बडगुजर, एकनाथ रामलाल बडगुजर, गोपाल अशोक पाटील, सागर दत्तू पाटील, चेतन शांताराम बडगुजर, पंकज नामदेव बडगुजर, योगेश फुलचंद बडगुजर, राहुल सुभाष पाटील, पवन योगेश बडगुजर, समाधान मुरलीधर बडगुजर, सुधाकर बुधा बडगुजर, भागवत प्रल्हाद बडगुजर, सुनील पंडित बडगुजर, नामदेव पुजा बडगुजर, फुलचंद धनराज बडगुजर, कैलास बारीनाथ बडगुजर दत्तू कौतिक पवार, शालेय बाबुलाल पाटील, अशोक रतन पाटील, सुरेश एकनाथ शिंपी, परशुराम भगवान बडगुजर, संभाजी शिवाजी पाटील, रमेश रामदास बडगुजर, सुपडू बाबूलाल पाटील, आनंदा अहिरे, पुंडलिक अहिरे, कांतीलाल देवाजी पाटील, नितीन युवराज बडगुजर, अशोक रामदास बडगुजर, शामराव रघुनाथ बडगुजर, एकनाथ रामलाल बडगुजर, वीरभान धनराज बडगुजर, रमेश राजाराम पाटील, गणेश रमेश पाटील, राजेंद्र रमेश पाटील व नरेंद्र भाऊराव सूर्यवंशी यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.
वरसाडे येथून आदिवासी भिल्ल समाजबांधव मोठ्या संख्येने शिवसेना-उबाठा मध्ये दाखल झाले. यात प्रामुख्याने सागर देवचंद भिल, कुंदन देवचंद भिल, दीपक साहेबराव भील, अपरूप सुपडू भील, शिवा विनोद भिल, द्वारकानाथ रामदास भिल, सुनील साहेबराव भील, सोपान सुभाष भिल, कार्तिक देवचंद भिल, देविदास रोहिदास भिल राजेंद्र सुकलाल भिल, अशोक बापू भील गोपाल श्रीराम भील, राहुल सुकलाल भिल, प्रवीण श्रीराम भील, प्रभाकर रोहिदास भील. संदीप श्रीराम भिल्ल. रामदास बिल बादल, अंकुश भील, ईश्वर बुधा भील, योगेश जुलाल भील, एकनाथ दगडू भील, विजय युवा भील, दिलीप जुलाल भील, रमेश शालिक भील, समाधान दगडू भील, दीपक शांताराम भील, विशाल अंकुश भील, गोरख शालिक भील, येशू दगडू भिल, सोपान प्रभाकर भिल, ज्ञानेश्वर सुपडू भील, गोविंदा दोधा भिल, गोविंदा सुखदेव भिल, विनोद पोळा भील, साहेबराव देवचंद भिल, विनोद अशोक भील, देवचंद केशव भील, सुभाष बापू भील, रवींद्र रामचंद्र भील, सुपडू कृष्णा भील, अंकुश दोधा भील, शिवा सोनू भील, उत्तम बुद्धा भील, रवींद्र बळीराम भील, बुधा वना भील यांनी शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश केला.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे वैशालीताई सूर्यवंशी यांनी उपरणे देऊन स्वागत केले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळेस बोलतांना वैशालीताई म्हणाल्या की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विचारांना प्रमाण मानून व आर. ओ. तात्या पाटील यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे नेत आपली वाटचाल सुरू आहे. समाजाच्या सर्व स्तरांमधून याला पाठींबा मिळत असून आज झालेले पक्षप्रवेश हे जनतेच्या प्रेमाची साक्ष असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
दरम्यान, माहेजी, कुरंगी, बांबरूड आणि परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश झाल्यामुळे या भागात शिवसेना-उबाठा पक्ष मजबूत झाल्याचे मानले जात आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह तालुकाप्रमुख शरद पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक राजू काळे, विकास वाघ, गफार भाई, मनोज चौधरी शहर युवा अधिकारी पाचोरा, परदाडे सावकार दादा, सुनील पाटील, अमरसिंग पाटील, अशोक कुमावत, मनोज पाटील, खेडगाव नंदीचे सचिन पाटील, मुन्ना संगवी, अशोक पितांबर, श्रीराम ढमाले, किरण पाटील, हडसन देवा भाऊ, बापू पाटील, नितीन महाजन, संजय ठाकरे, अशोक महाजन एकनाथ महाराज महान आप्पा पाटील, विनोद आप्पा, बाविस्कर नांद्रा, आनंदा पाटील, नांद्रा राजू भैय्या रवींद्र पोपट पाटील कैलास पाटील प्रवीण पाटील, हेमराज पाटील समाधान पाटील या मान्यवरांची व समस्त ग्रामस्थ मंडळी सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.