गुजरातमधील पालनपूर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणाऱ्याला व्यक्तीला अटक केली आहे. थेट रस्त्यावर नमाज अदा करत असलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी सदर व्हिडीओची दखल घेत संबंधित इसमाला अटक केली आहे.
दि. १३ जानेवारी रोजी पालनपूर पोलिसांनी बाचल खान नावाच्या ट्रक चालकाला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अटक केली. महामार्गावरील व्यस्त चौकात ट्रक थांबवून रस्त्याच्या कडेला नमाज अदा केल्यामुळे खानला पकडण्यात आले. पोलिसांनी व्हिडीओच्या माध्यमातून तपास केल्यानंतर स्पष्ट दिसत आहे की, बच्चल खानने आपला ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला आणि एका व्यस्त हायवे चौकात वाहतूक विस्कळीत करत नमाज अदार करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलीस अधिका-यांनी सांगितले की, हा व्हिडिओ एका वाटसरूने शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता, त्यानंतर संबंधित व्हिडीओद्वारे पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच, भारतीय दंड संहिता कलम २८३, १८६ आणि १८८ अंतर्गत बच्चल खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.