जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव लोकसभा निवडणूकीकरिता शिवसेनेला वातावरण पूरक आहेत त्यामुळं जळगाव लोकसभेची जागा आम्हाला सोडण्यासाठी आग्रही आहेत याबाबत आम्ही मागणी करणार असून महायुतीत असलेल्या शिवसेनेने जळगाव लोकसभा जागेवर दावा केला आहे.
देशात लोकसभा निवडणूक पूर्व तयारी सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सूचनेनुसार आज दिनांक ७ जानेवारी रोजी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी आढावा बैठकीसाठी जिल्ह्यात आले असता पत्रकारांशी बोलतांना त्यांनी जळगाव लोकसभा जागेवर आग्रह असल्याचे सांगितले.
लोकसभा आढावा बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोरअप्पा पाटील, माजी जि. प. सदस्य पवन भिलाभाऊ सोनवणे, जिल्हप्रमुख निलेश पाटील, जिल्हाप्रमुख, ललित कोल्हे आदी नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थिती होती.
यावेळी निवडणुका तोंडावर असून बूथ स्तरावरून काम सक्षम करण्यात करावे,आपण केलेल्या कामाचे बोर्ड लावून जनतेपर्यंत काम पोहचवावे असे आवाहनही यावेळी नेत्यांनी केले असून पाचोरा भडगाव मतदार संघात प्रथमच महिलांना बूथ प्रमुखची जबाबदारी दिली असून हा राज्यातील पाहिला प्रयोग असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.