विधवा असलेल्या महिलेवर डोळा ठेवला… तिच्याकडे त्याने शरीर संबंधास वारंवार मागणी केली पण तीने त्यास नकार दिल्याने नकार देणाऱ्या महिलेची त्या नराधमाने हत्या केली व महिलेचा मृतदेह ऊसाच्या फडात फेकून देत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने आरोपीचे बिंग फुटले.या सर्व घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! सेल्फीच्या मोहाने गेला बळी; २० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
सदर संतापजनक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.योगेश पांडुरंग पाटील (वय ४६, रा. भादवन) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आईसोबत भादवन येथे राहत होती.पीडिता विधवा असल्याने आरोपीचा तिच्यावर डोळा होता. शुक्रवारी मृत महिला भादवन ते भादवनवाडी रस्त्यावरून जात असताना आरोपीने तीला शरीरसंबंधाची मागणी केली त्यावेळी महिलेने त्यास नकार दिल्याने त्या नराधमाने तिचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला दरम्यान ती यावेळी जोरदार विरोध करत असल्याने नराधमाने तीला कायमचं संपवलं.
पाचव्या मजल्याच्या बाल्कनीतून पती पत्नी खाली पडले,अंगावर शहारे येणारा व्हिडीओ व्हायरल
महिलेचा गळा आवळून खून केला. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्याने मृतदेह ऊसाच्या फडात फेकून देत पेटवून दिला. दरम्यान, ऊसाच्या फडाला आग लागल्याचं कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येतं मोठी गर्दी केली.यावेळी आग विझवण्यासाठी आरोपी योगेश सर्वात पुढे होता. त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. मात्र सदर संपूर्ण घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांनी तपासल्यावर आरोपी योगेश पाटील याच्या मुसक्या आवळल्या.