जळगाव,(प्रतिनिधी)- आदिवासी कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले नोंदींनुसार सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे या मागण्यांसाठी ४ जानेवारी २०२४ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आदिवासी कोळी समाजातर्फे मंगळवार दि. २६ रोजी आदिवासी कोळी समाजातर्फे मंगळवारी गणेश सोनवणे यांनी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी कोळी समाजबांधवांना जातप्रमाणपत्र देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असून, जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. न्यायासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाच्या १० पदाधिका-यांसह दोन महिलांनी १० ऑक्टोबरपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले होते. ते २६ दिवस सुरू होते.
हिवाळी अधिवेशनात समाजाचे प्रश्न मांडले नाहीत. त्यांनी समाजाच्या प्रश्नांकडे मुद्दाम डोळेझाक केली आहे. संविधानाप्रमाणे समाजबांधवांना सवलती देणे आवश्यक आहे आणि आमचा हक्क आहे. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यामुळे ४ जानेवारी २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे, असा इशारा आदिवासी कोळी समाज महासंघाचे पदाधिकारी अॅड. सोनवणे यांनी दिला. याप्रसंगी पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी, रवींद्र कोळी, अर्जुन सोनवणे, भगवान सोनवणे, गोपाल सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते….