विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे, पुढील शैक्षणिक वर्षांपासून एका नव्या विषयाचा समावेश करण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दापोलीमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.मंत्री दीपक केसरकर यांनी दापोली कोकण कृषी विद्यापीठाला भेट दिली त्या दरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे.
‘या’ विषयाचा होणार समावेश
भविषष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषीचे धडे मिळणार आहेत.पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना ‘कृषी’ हा विषय शिकवला जाणार आहे. मुलांमध्ये जर निसर्गाची, कृषिची आवड निर्माण करायची असेल तर कृषीला पर्याय नाही म्हणून आता पहिलीपासून कृषी हा विषयाची सक्ती करण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.
शिक्षकांनाही प्रशिक्षण…
पुढील वर्षात कृषी या विषयाचा समावेश करायचा झाल्यास शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. शिक्षकांनी कृषी शिक्षण घेतलेलं नसतं, कोणी बीएस्सी बीएड केलं आहे, कोणी बीए बीएड केलं आहे, तर कोणी एचएससी डीएड केलं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना देखील कृषीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला आहे. यंदाच्या चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
इतर बातम्या….
शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
दोरीने लपेटलेला ड्रेस तुम्ही पाहून व्हाल हैराण ; उर्फीने केला बोल्ड व्हिडिओ शेअर
Lic credit card; एलआयसी क्रेडिट कार्ड वर ५ लाख विमा संरक्षणासह अनेक फायदे
साई दर्शनासाठी आलेल्या बहीण-भावंडांची शिर्डीत लॉजवर आत्महत्या
हे तुम्हाला माहीत आहेत का?, तुमच्या बँक खात्यात पैसे नाहीत तरीही काढू शकता १० हजार रुपयांपर्यंत रक्कम!
curative petition ; क्युरेटिव्ह पिटीशन ही शेवटची संधी ! मराठा आरक्षण संदर्भात क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केली म्हणजे काय जाणून घ्या…
जगातील सर्वात जास्त विषारी वनस्पती कोणती?
शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान शोधून काढलं ; माणसाचा मृत्यू कधी होणार हे समजू शकणार
क्रिकेटच्या मैदानात मनोज जरांगेंची जोरदार फटके बाजी ; व्हिडीओ तुफान व्हायरल