महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडून शिपाई पदासाठीची भरती जाहीर करण्यात आली असून यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध झालीय. त्यानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची सुविधा २० सप्टेंबर २०२३ रोजी http://www.dtp.maharashtra.gov.in या बेवसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या भरतीद्वारे एकूण १२५ जागा भरल्या जातील. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्याद, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
एकूण रिक्त पदे – १२५
पदाचे नाव – शिपाई (गट-ड)
शैक्षणिक पात्रता – १० वी पास.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ/ खेळाडू/ EWS उमेदवारांना ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – १०० रुपये.
मागासवर्गीय – ९०० रुपये.
अधिकृत बेवसाईट – https://dtp.maharashtra.gov.in/
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा