जामनेर,(प्रतिनिधी)- मंत्री ना. गिरीश महाजण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते निलेश सिसोदिया यांच्या माध्यमातून आज पिंपळगाव गोलाईत येथील राष्ट्रवादीचे बूथ प्रमुख तथा माजी दूध डेरी चे चेअरमन कोमलसिग हिलालसिंग पाटील व तसेच राष्ट्रवादीचे व्हाईस चेअरमन विकास सोसायटी सोनाळा शेखर चिंधु पाटील यांच्या समवेत कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्ष खालील संपन्न झाला.
यावेळी दशरथ शिंदे गोकुळ शिंदे अशोक शिंदे ज्ञानेश्वर बिचारे सागर परमार अभय सिसोदे पिंटू जोहारे अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मंगल सिंग राजपूत,गोपाल सिसोदे,संदीप किसन सिंग सिसोदे, गोपाल मंगल सिग सिसोदे, निलेश शिसोदे उपस्थित होते.
दरम्यान यावेळी प्रवेशा नंतर नव्याने प्रवेश घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी गावाच्या विकासाठी ना. गिरीश महाजन यांच्याकडे साकडे घालत फादर तलावात पाणी टाकाणे,
शेरी रस्ता भवानी मंदिराकडे जाणारा डांबरीकरण करण्यात यावा गावातील राहिलेला विकास काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी ना. महाजन यांनी गावाच्या विकासाकरिता प्रयत्न करण्याचे अश्वासन दिले.