कानपूरमधील काकदेव कोचिंग मंडी येथील गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डनचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली असतांना आता शवविच्छेदनच्या अहवालानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.अहवालामध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली असून अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असल्याबाबत डॉक्टरांनी देखील सांगितले आहे.
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळेच आरोपीने ही क्रूरता केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी मुख्य आरोपी कुलदीप यादव उर्फ अर्जुन याच्याविरुद्ध बलात्कारानंतर हत्येचा गुन्हा नोंद करुन त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
मूळची हरदोई येथील 35 वर्षाची असलेली महिला गेल्या अडीच वर्षांपासून एका वसतिगृहात वॉर्डन म्हणून काम करत होती. हे काम करत असतानाच ती तिसर्या मजल्यावर असलेल्या एका टिफिन शॉपवरही काम करत होती. मात्र सोमवारी त्याच महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नग्नावस्थेत पडलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर त्याचा अहवालही पोलिसांनी मागवून घेतला होता.
शवविच्छेदनाचे अहवाल पाहिल्यानंतर मात्र पोलिसानांही धक्का बसला आहे. कारण त्या अहवालामध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून प्रायव्हेट पार्टवरला गंभीर दुखापत करण्यात आली आहे. तर डोक्याच्या मागील बाजूलाही मोठी जखमी झाली असून महिलेचं डोकं भिंतीवर आदळून मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त