जळगाव : चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत गुरुवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उद्योगमंत्री उदयसामंत यांनी चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता दिली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत औद्योगिक क्षेत्रालागत चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास मान्यता मिळावी अशी मागणी केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनुसार कुसुंबे खुर्द व चिंचोली येथील प्रस्तावित क्षेत्राची पाहणी केली होती. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.

