मुंबई,(प्रतिनिधी): अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून यात आम्ही आपत्र नाहीच…आम्हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या १४ आमदारांकडून पावसाळी अधिवेशनाच्या काळातच प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरील आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू असून, या सुनावणीती दरम्यान आमदारांना त्यांचं म्हणणं मंडण्याची संधी देण्यात आली होती, प्रत्येक आमदार यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सांगण्यात आले होते दरम्यान शिंदे गटाच्या ३९ आमदारांकडून प्रत्येकी ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. इतक्या लांबलचक प्रतिज्ञापत्रांवर अध्यक्ष काय निर्णय घेतात आणि यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत सर्वांचे लक्ष लागून आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपविण्यात आला आहे. योग्य कालावधीत ही निर्णय प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे .