नशिराबाद,(प्रतिनिधी)- स्वराज्य जननी प्रतिष्ठान, नशिराबाद संस्थापक अध्यक्ष मोहित येवले यांच्या माध्यमातून नशिराबाद,भवानीनगर,भवानी माता मंदिर येथे मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिर अश्विनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आले आरोग्य शिबिरा प्रसंगी उपस्थित तज्ञ डॉ. रागिनी पाटील, डॉ.स्वप्निल चौधरी, डॉ. उमेश पाटील, डॉ. खुशाल जावळे, डॉ. वैभव पाटील,डॉ.अमोल पाटील, डॉ. आरुषी पाटील , डॉ. खुशी ठोंबरे व इतर सहाय्यक डॉक्टर्स उपस्थित होते.
रुग्णांच्या आजाराविषयी आवर्जून चौकशी करण्यात आली व उपचार करण्यात आले शिबिराचा सुमारे 150 रुग्णांनी लाभ घेतला याप्रसंगी शिव सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक गणेश भाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाप्रसंगी होती या वेळी डॉ.रमेश येवले ,मुकुंदा रोटे,विनोद रंधे,सतीश सावळे, दीपक कोळी, प्रदीप साडी,संदीप माळी, विकास बिराडे,युराज सोनटके, आनंद रंधे, प्रदीप सुरवाडे,नितीन बेंडवल, विलास नाथ, मोहन माळी, योगेश कोलते , नरेंद्र धर्माअधिकार उपस्थित होते.

