जळगाव दि. 13 प्रतिनिधी – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा चषक साठी रवाना झाला. महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा चषक 2023 च्या स्पर्धा दि. 15 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान ठाणे येथील दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये होणार आहे.
फोटो कॅप्शन – (डावीकडून)खाली बसलेले अरविंद देशपांडे, चंद्रशेखर जाखेटे, विनीत जोशी, किशोर सिंह सिसोदिया. मागील रांगेत उभे असलेले रीत नाथांनी, गीता पंडित, संस्कृती चौधरी, इशिका शर्मा, राजश्री पाटील, शुभम चांदसरकर, तेजम केशव, करण पाटील, अर्श शेख, रौनक चांडक, दक्ष चव्हाण, जाझीब शेख.
जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या मुलींच्या संघात रीत नाथांनी, गीता पंडित, संस्कृती चौधरी, इशिका शर्मा, राजश्री पाटील तसेच मुलांच्या संघात शुभम चांदसरकर, तेजम केशव, करण पाटील, जाझीब शेख, अर्श शेख, रौनक चांडक, दक्ष चव्हाण यांची निवड झाली आहे. या खेळाडूंसोबत संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष तेजेंद्र महिंद्रा, सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य शेखर जाखेटे यांनी पुढील स्पर्धेसाठी संघाचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या आहे.

