चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच चाळीसगावमधून संतापजनक घटना समोर आलीय. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली असून इतकंच नव्हे तर तिला कल्याणला जाण्याचे सांगून पळवून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ जुन रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका विधीसंघर्षीत अल्पवयीन मुलाने पिडीत मुलीला आत्महत्या करून तुझ्या नातेवाईकांना गुन्ह्यात अडकवून टाकेल अशी धमकी देत तिच्यावर शहरातील एका भागात नेवून अत्याचार केला.
एवढेच नाही तर तिला एका महिलेच्या मदतीने सोबत घेवून कल्याण येथे घेवून गेला. त्यानंतर पिडीत मुलगी घरी आल्यावर तिने नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसा अल्पवयीन मुलासह अनोळखी महिलेवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहे.

