जळगाव । एक माथेफिरुन रेल्वे मालगाडीवर चढत असताना त्याला विद्यूत शॉक लागल्याची धक्कादायक प्रकार जळगाव रेल्वे स्थानकावर घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय आहे घटना?
जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळ एका उभ्या असलेल्या मालवाहू रेल्वेच्या डब्यावर उभा राहिल्याने एका अनोळखी अंदाजे ५० वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना शुक्रवारी घडली आहे.
जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या तारांच्या विद्युत धक्क्याने अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू#marathinews pic.twitter.com/9uC5LaTvjM
— News18Lokmat (@News18lokmat) July 15, 2023
ही घटना घडल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतिफ शहा यांनी तपासणी यांची मयत घोषित केले. रेल्वे पोलीस कर्मचार्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नजीकच्या जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुमार भावसार हे करीत आहे

