जळगाव/मुंबई : राज्यात पूर्णपणे मान्सून दाखल झाला असला तरी अद्यापही काही जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा असून बळीराजा संकटात सापडला आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील ओढवलं आहे. मात्र, अशातच आता येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यात आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
राज्यात येणाऱ्या मोसमी वाऱ्याचा जोर वाढला असून बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जात आहे. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात येत्या १९ ते २२ जुलै रोजी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हे पण वाचा..
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख ; जळगावातील इतका रुग्णांनी घेतला लाभ
राज्य सरकारचा दुधाच्या किमतीबाबत मोठा निर्णय ! आता ‘इतका’ दर द्यावाच लागणार?
महाराष्ट्रात निवडून आलेल्या ४२२ आमदार, खासदारांबाबत धक्कादायक माहिती उघड, काय आहे पहा..
आनंदाची बातमी! महाराष्ट्रात लवकरच ५० हजार शिक्षक भरती
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजनुसार, किनारपट्टीवर मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.
सोलापूर, सातारा, नाशिक, नंदूरबार, ठाणे आणि पालघर हे जिल्हे वगळत अन्य सर्व जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

