भुसावळ । आधीच तांत्रिक कारणामुळे भुसावळ पुणे हुतात्मा गाडी रद्द केली असता त्यात आता भुसावळ-दौंड-भुसावळ साप्ताहिक मेमू रेल्वेगाडी देखील रद्द करण्यात आलेली आहे. तांत्रिक कारणामुळे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
01135 / 01136 भुसावळ -दौंड- भुसावळ मेमू साप्ताहिक विशेष ट्रेनचा प्रवाशांसाठी उपयुक्त असल्याने काेविड -19 च्या काळानंतर देखील ट्रेनची संरचना, वेळ आणि थांबे इत्यादींमध्ये कोणताही बदल न करता ती चालविण्यासाठी मुदत वाढ मिळाली हाेती. त्यास प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला हाेता.
हे पण वाचा….
खातेवाटपासंदर्भात मोठी अपडेट! राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांना ‘हे’ खातं मिळणार?
जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांना वेग ; आतापर्यंत ‘इतके’ टक्के झाल्या पेरण्या
दरीत ओढत नेत महिलेवर आठ जणांनी केला आळीपाळीने बलात्कार : बुलढाण्यातील खळबळजनक घटना
दरम्यान भुसावळ-दौंड-भुसावळ साप्ताहिक मेमू रेल्वेगाडी तांत्रिक कारणामुळे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ही मेमू सेवा प्रामुख्याने पुणे विभागाच्या मेमू रेकच्या नियोजित देखभालीसाठी चालविण्यात आली होती मात्र ही ट्रेन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने आता मात्र प्रवाशांचे हाल होणार आहे.