मुंबई । गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अजित यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र खातेवाटपावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सतत बैठका होत आहे. अशातच खातेवाटपासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
शिंदे गटाकडील ४ खाती आणि भाजपकडील ५ खाती अजित पवार यांच्या गटाला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं. सोबत राष्ट्रवादीला सहकार, महिला व बाल कल्याण, सामाजिक न्याय ही खाती देखील राष्ट्रवादीच्या पदरात पडणार असल्याचं समजतं.
ब्रेकिंग
अजित पवार गटाला मिळणारी खाती
अर्थ – अजित पवार
कृषी- छगन भुजबळ
सहकार- दिलीप वळसे पाटील
परिवहन- धर्मराव अत्राम
सामाजिक न्याय – धनंजय मुंडे
अन्न नागरी पुरवठा – अनिल भाईदास पाटील
महिला बाल कल्याण – अदिती तटकरे
क्रीडा – संजय बनसोडे
अल्पसंख्यांक – हसन मुश्रीफ— Rashmi Puranik (@Marathi_Rash) July 14, 2023
कोणत्या मंत्र्यांना कोणते खातं मिळण्याची दाट शक्यता?
अजित पवार – अर्थ विभाग
दिलीप वळसे पाटील – सहकार
छगन भुजबळ – कृषी
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
हसन मुश्रीफ – अल्पसंख्यांक
धर्मराव अत्राम – परिवहन
अनिल भाईदास पाटील – अन्न नागरी पुरवठा
अदिती तटकरे – महिला बाल कल्याण
संजय बनसोडे – क्रीडा

