जळगाव : मागच्या तीन चार दिवसापूर्वी अजित पवार यांनी मोठा राजकीय भूकंप घडवून आणत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सोबत आठ आमदारांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. त्यात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर अनिल पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा त्यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे नाही तर त्यांच्या मातोश्री पुष्पाबाई पाटील यांच्यामुळे सुरू आहे.
मुलाने मंत्रिपदाची शपथ घेतली तरीही त्या एसटीने प्रवास करतात आणि शेतीची देखभाल देखील करतात. लेक मंत्री झाला तरी पुष्पाबाई एसटीनं ये-जा करतात त्यामुळे त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे
पुष्पाबाई पाटील या रोज एसटी बसने प्रवास करतात. एसटी बसने त्या अमळनेरहून हिंगोणे या गावी त्या आपल्या शेतात पोहोचल्या. दरम्यान, मंत्री अनिल पाटील यांच्या आई आपल्यासोबत बसने प्रवास करत आहेत हे कळताच. वाहक मनोज पाटील यांनी पुष्पाबाईंच्या साधेपणाचा हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपला. मुलगा मंत्री असूनही त्या बसने प्रवास करताहेत, याचं मला खूप कौतुक आहे, असंही वाहक मनोज पाटील म्हणाले. तर यानंतर पुष्पाबाई पाटील यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
पुष्पाबाई पाटील या आधीपासूनचा त्या साधेपणाने राहतात. मुलाला पद मिळाल्यानंतरही त्यात बदल झालेला नाही.लेकाला मंत्रिपद मिळालं तेव्हा देखील त्या शेतात काम करत होत्या. लेकाला मंत्रिपद मिळाल्याचं कळताच त्यांना मोठा हर्ष झाला

