मुंबई । शेअर बाजारात आज जबरदस्त तेजी दिसून आली. सेन्सेक्सने आज आपले सर्व जुने रेकॉर्ड तोडले असून आतापर्यंतची सर्वोच्च विक्रमी पातळी गाठली. आज सेन्सेक्स 803.14 अंकांच्या वाढीसह 64,718.56 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टीही प्रथमच 19 हजारांच्या पुढे बंद झाली. आज निफ्टी 216.95 अंकांनी वाढून 19,189.05 वर बंद झाली
हे पण वाचा..
धक्कादायक! नवदाम्पत्याने विषप्राशन करून संपविले जीवन
अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला, तारीखही झाली फिक्स?
कॉलेजला जाते म्हणून घरातून बाहेर गेली, नंतर विहिरीत घेतली उडी ; मुलीच्या आत्महत्येने कुटुंबीय हादरले
शेवटी सेन्सेक्सच्या या तेजीचे कारण काय?
बाजाराला विक्रमी उंचीवर नेण्यात मोठा वाटा, हेवीवेट शेअर्स, मेटल सेक्टर शेअर्समध्ये खरेदीदारांची आवड वाढली. बुधवारच्या ट्रेडिंग सत्राच्या पहिल्या तीन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी तीन लाख कोटी रुपयांचा फायदा मिळवला. मान्सूनची सुरुवात, एचडीएफसी बँक आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पचे विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा आणि जून डेरिव्हेटिव्ह मालिका संपल्याने बाजाराला हा विक्रमी उच्चांक गाठण्यात मदत झाली. गुंतवणूकदारांमधील सकारात्मक वातावरणाचा फायदा अमेरिकन बाजारातील तेजीचाही झाला. त्यामुळे सर्वच क्षेत्र हिरव्यागार चिन्हावर राहिले.
M&M- इन्फोसिस निफ्टी-50 टॉप गेनर
सेन्सेक्समधील 30 शेअरांपैकी 28 वाढले आणि 2 घसरले. दुसरीकडे, M&M, Infosys, IndusInd Bank, Sun Pharma, Hero MotoCorp, TCS, मारुती आणि बजाज ऑटो यांच्यासह 40 निफ्टी-50 शेअरनी प्रगती केली. अदानी पोर्ट्स, ग्रासिम, अपोलो हॉस्पिटल्स, एचडीएफसी लाइफ, अदानी एंटरप्रायझेस, डिव्हिस लॅब, आयसीआयसीआय बँक आणि बीपीसीएल या 10 निफ्टी समभागांमध्ये घसरण झाली.

