मुंबई । राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आज होणार की उद्या होणार? अशी चर्चा गेल्या मागील काही महिन्यापासून सुरु असून अशातच आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखच फिक्स केल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची तब्बल तीन ते चार तास शाह यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर मध्यरात्री हे नेते मुंबईत आले. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवण्यात आली.
हे पण वाचा..
कॉलेजला जाते म्हणून घरातून बाहेर गेली, नंतर विहिरीत घेतली उडी ; मुलीच्या आत्महत्येने कुटुंबीय हादरले
मोठेपण भोवला! नोटांच्या बंडलसोबत कुटुंबीयांचा सेल्फी काढून व्हायरल केला अन् मग….
सरकारची मोठी घोषणा! १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक गावात पोहोचणार ही सुविधा, काय आहे घ्या जाणून..
Jalgaon ! पोलिसांच्या धावत्या वाहनावर पडले वृक्ष, पोलीस निरीक्षकासह चालक ठार
तसेच किती मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा? त्यांना कोणती खाती द्यायची? किती पालकमंत्री करायचे? फडणवीस यांच्याकडे कोणती खाती राहतील? मित्र पक्षांचा समावेश आदी मुद्दयावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या रविवारी किंवा बुधवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. कॅबिनेट आणि राज्य मंत्रिपद देण्यात येणार आहे. तर शिंदे गटाकडून या दोन्ही मंत्रीपदासाठी ज्येष्ठ नेत्यालाच संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

