लखनऊ : पोलीस अधिकाऱ्याची बायको आणि मुलाने 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलसोबत सेल्फी काढलेला फोटो व्हायरल झाल्याने एक पोलीस अधिकारी अडचणीत सापडला आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बायको आणि मुलाने 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलसोबत सेल्फी काढले.
संबंधित पोलीस अधिकारी उत्तर प्रदेश उन्नावचा आहे. रमेश चंद्र साहानी असं पोलीस अधिकाऱ्याच नाव असून त्याची पोलीस लाइनमध्ये बदली करण्यात आली आहे. सोशल माीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन्ही मुलं बेडवर बसलेली आहेत. तिथे 500 रुपयांच्या नोटांची बंडलं मांडलेली आहेत. ही एकूण रक्कम 14 लाखाच्या घरात आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
आम्ही या फोटोची दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्याची बदली केलीय आणि चौकशी सुरु केली आहे” असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

