जळगाव । भडगाव येथील साई ऑटो बजाज शोरूम मधून ३० दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) लावला असून चोर दुसरा कोणी नसून तो शोरूममध्ये काम करणाराच होता. चोरट्याकडून २६ दुचाकी हस्तगत केल्या असून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोरुममधील मेकॅनिक शोएब खान रऊफ खान रा. नगरदेवळा ता. पाचोरा असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
भडगाव येथे साई ऑटो बजाज शोरूम मधून २२ लाख ७७ हजार ९८० रुपयांच्या ३० दुचाकी टप्प्याटप्प्याने चोरून नेल्याचा प्रकार उघड झाल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने शोरुममधील मेकॅनिक शोएब खान रऊफ खान यांच्याकडे संशय आल्याने लक्ष केंद्रित केले.
हे सुद्धा वाचा..
अरे बापरे! विष पाजून तरुणाला संपविले ; पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या
शेतकऱ्यांनो.. पेरणी योग्य पावसासाठी करावी लागेल प्रतीक्षा ; स्कायमेटचा नवीन अंदाज वाचा..
लाच भोवली! शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह तिघांना रंगेहात पकडले, एरंडोल येथील घटना
महाराष्ट्र सागरी मंडळात या पदांवर निघाली भरती! 56100 पगार मिळेल, कसा कराल अर्ज??
तो मागिल दहा महिन्यापासून काम करीत होता. शोएब हा सकाळी आठ वाजता शोरूमला जाऊन साफसफाई करायचा. यावेळी शोरूममध्ये कोणी नसल्याची संधी हेरून शोरूम मधून दोन महिन्यांत एक ते दोन दिवसाआड नवीन दुचाकी लांबवायचा. अश्याप्रकारे दोन महिन्यांत १४ पल्सर व १६ प्लॅटिना तब्बल ३० नवीन विनानंबरच्या नव्या दुचाकींची त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
संशयित शोएब खान व त्याचे सहकारी यांनी चाळीसगाव,मालेगाव, सिल्लोड, वैजापूर, औरंगाबाद, पिशोर, कन्नड, भराडी, बाळापूर ,नागद, जामठी अशा विविध भागांमध्ये दुचाकी कमी किमतीत विक्री केल्या आहे. या दुचाकीतून ११ पल्सर, १५ प्लेटीना अशा १९ लाख ५८ हजार १३९ रुपयांच्या २६ दुचाकी जमा करण्यात आल्या आहेत. शोएब सोबत त्याला मदत करणाऱ्या इतर संशयित साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

