जळगाव,(प्रतिनिधी): महसूल विभागाने सोमवारी रात्री तहसीलदार संवर्गातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार भुसावळ,मुक्ताईनगर, जामनेर तहसीलदारांच्या अन्यत्र बदल्या केल्या आहेत. त्यांच्याजागी अन्य विभागातून तीन नूतन तहसीलदार नियुक्ती झाली आहे, तरपाचोरा प्रांतधिकारी म्हणून भुषण अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच धरणगाव तहसीलदार म्हणून महेंद्र सूर्यवंशी यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत.
सोमवारी रात्री निघालेल्या आदेशानुसार मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांची त्र्यंबकेश्वर येथे बदली झाली आहे. त्यांच्याजागी डी. एल. मुकुंदे यांची नियुक्ती झाली आहे. भुसावळचे तहसीलदार दीपक धिवरे यांची मालेगाव येथे धान्य वितरण अधिकारी म्हणून, तर त्यांच्या जागी प्रशांत सांगळे यांची आणि जामनेरचे अरुण शेवाळे यांची धुळे ग्रामीण तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याजागी नानासाहेब आगळे यांची यापूर्वीच नियुक्ती झाली असून, ते रुजूही झाले आहेत.
मुक्ताईनगर व भुसावळ तहसीलदारांना दि. १५ जूनपर्यंत हजर होण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. पाचोरा प्रांताधिकारी म्हणून सिंदखेडराजा येथून भूषण अहिरे रुजू होणार आहे, तर सध्याचे प्रांताधिकारी विक्रम बांदल यांना विटा (सांगली) प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यात झालेल्या बदल्यांनंतर ८ पैकी ५ अधिकारी रुजू झाले होते.