जळगाव : जळगाव शहरातील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणीचा वारंवार फोन करून त्यानंतर तिचा दुचाकीने पाठलाग करत विनयभंग केला. या प्रकाराला वैतागून अखेर तरुणीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित तरुणाविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर संशयित आरोपी रवींद्र खेडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
रामानंदनगर पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील राहणारी २० वर्षीय तरुणी ही जळगावातील रामानंदनगर परिसरात एका परिसरातील एका गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्याला आहे. सध्या तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. शनिवारी १०जून रोजी सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान रवींद्र खेडकर याने तरुणीच्या फोनवर कॉल केला. त्यानंतर तिचा दुचाकीने पाठलाग करत विनयभंग केला.
हे पण वाचा..
कल्याण तर आहेच ठाणे लोकसभाही भाजपचीच ; शिंदे-पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ?
‘या’ राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी, जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
राज्यात पुढच्या 3 ते 4 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता : तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..
हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रविवार ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी रवींद्र खेडेकर यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करीत आहे.

