जळगाव : छत्रपती शिवरायांनी शेती व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हे धोरण बाळगून रयतेचं व बळीराजाचा राज्य निर्माण केले होते त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सरकार कार्य करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ना.गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांच्या सहकार्याने आज जळगाव जिल्ह्यातील 350 पेक्षा अधिकच्या गावांमध्ये शेतकऱ्यांना विविध योजना अंतर्गत बियाण्याचे वितरण (मका,सोयाबीन, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग इ.) तालुकास्तरावर करण्यात आले.
यावेळी बोलताना ना. गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितले की केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार शेती व शेतकऱ्यांकरिता विविध योजनेच्या माध्यमातून शाश्वत विकासाच्या दृष्टीने पावले टाकत असून शेतकऱ्यांकरिता मोठ्या प्रमाणात नवीन योजना प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून वर्ष 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेल्या असून लहान, अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम या माध्यमातून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येत आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार विविध योजना जसे की, जलयुक्त शिवार योजना २, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा टप्पा २), मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,मॅग्नेट, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, आत्मा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान इ. योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शाश्वत व आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिने सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात सहाय्यक करत असून यापुढे देखील शेती व शेतकऱ्याचा विकास याकरिता कटिबद्ध असल्याचे यावेळी दुरध्वनी वरुण बोलतांना ना. गिरीश महाजन यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने बळीराजाचे राज्य स्थापन केले त्याच पद्धतीने येत्या काळात शेती शेतकरी व शेतकऱ्यांचा कल्याण हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करत राहणार असल्याचे ना. गिरीश महाजन म्हणाले.
सदर कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अमन मित्तल, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.संभाजी ठाकूर, प्रकल्प संचालक आत्मा जळगाव श्री.चलवदे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक श्री.अरविंद देशमुख, तालुका कृषि अधिकारी श्री. शिवाजी राऊत कृषी विभागाचे अधिकारी मंडल कृषी अधिकारी वाल्हे साहेब डॉ राधेश्याम चौधरी हे.भ.प जळकेकर महाराज गोपाळ भंगाळे मिलिंद चौधरी समाधान धनगर अरूण सपकाळे नानाभाऊ कोळी किशोर भाऊ चौधरी मिलिंद चौधरी भूषण भोळे कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागेल त्याला…. मागेल ती योजना…. देण्याचा सरकारचा निर्णय : ना.गिरीश भाऊ महाजन
शेतकऱ्यांना मागेल त्याला योजना ज्यामध्ये फळबाग लागवड, शेततळे, प्लास्टिक अस्तरीकरण, शेडनेट, पॉलिहाऊस इ. एकच अर्ज मध्ये ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरून उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा आवाहन ना. गिरीश भाऊ महाजन यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी परिवेक्षक भामरे सर आभार सोनू पाटील यांनी मांडले