जळगाव : उन्हाळ्यात नेहमीच रक्ताची तुटवडा असतो. उन्हाचा पारा चढता असल्याने नियमित रक्तदाठ सुद्धा उन्हाळ्यात रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात. दिवसेंदिवस ब्लड बँकेमधील कमी होणारा रक्तासाठा लक्षात घेऊन CMS छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन आणि Trade with jazz जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे सुवर्णयोगी औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास संपूर्ण जळगाव शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत रक्तदात्यांचा अविरत ओघ चालू होता .
आजच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक गरजवंताना हा रक्त साठा नक्कीच उपयोगात येईल. CMS – छत्रपती मराठा साम्राज्य गृप चे संचालक श्री जितेंद्र पवार , श्री उदयराम पाटील , श्री दिपक चव्हाण , श्री केतन पाटील ,श्री कैलास पाटील व TWJ – चे मिलिंद पाटील , दुर्गेश पवार या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांनी सहकार्य केले.