बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने मोठ्या प्रमाणात नोकऱ्या काढल्या आहेत. बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in वर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. भरती मोहिमेअंतर्गत एकूण २४० पदांची भरती केली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जून निश्चित करण्यात आली आहे. परीक्षा 2 जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे :
1 | ऑफिसर-क्रेडिट | JMGS I | 200 |
2 | ऑफिसर-इंडस्ट्री | JMGS I | 08 |
3 | ऑफिसर-सिव्हिल इंजिनिअर | JMGS I | 05 |
4 | ऑफिसर-इलेक्ट्रिकल इंजिनिअर | JMGS I | 04 |
5 | ऑफिसर-आर्किटेक्ट | JMGS I | 01 |
6 | ऑफिसर-इकॉनॉमिक्स | JMGS I | 06 |
7 | मॅनेजर-इकॉनॉमिक्स | MMGS II | 04 |
8 | मॅनेजर-डेटा सायंटिस्ट | MMGS II | 03 |
9 | सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट | MMGS III | 02 |
10 | मॅनेजर-सायबर सिक्योरिटी | MMGS II | 04 |
11 | सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी | MMGS III | 03 |
आवश्यक पात्रता :
भरतीसाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांनी रिक्त पदांशी संबंधित विषयात पदवी आणि पीजी पदवी घेतली आहे. तसेच, उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 25/27 वर्षांपेक्षा कमी आणि 35/37 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल आहे, अधिक माहितीसाठी आणि इतर तपशीलांसाठी भरती अधिसूचना पहा.
अर्ज शुल्क
अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1180 रुपये शुल्क भरावे लागेल. तर, SC, ST आणि PWBD उमेदवारांना 59 रुपये शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांना प्रथम ऑनलाइन लेखी परीक्षेला बसावे लागेल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. दोन्ही परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांना कॉल लेटर पाठवले जातील. त्यानंतरच निवड होईल.
हे पण वाचा..
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत IB मार्फत 797 पदांवर भरती सुरु, आजच करा अर्ज
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती सुरु ; ७वी ते १० वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स
ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! पदवीधरांसाठी 303 पदांवर भरती
अर्ज कसा करावा
पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा म्हणजे www.pnbindia.in.
मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या करिअर पृष्ठावर क्लिक करा.
वर दिलेल्या PNB SO Apply Online लिंकवर क्लिक करा किंवा PNB SO भर्ती अंतर्गत उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा.
ऑनलाइन नोंदणीच्या वेळी आवश्यक तपशीलांसह नोंदणी करा.
PDF वर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसे की छायाचित्र, स्कॅन केलेली स्वाक्षरी इ.
अर्ज फी सबमिट करा.
अर्ज फॉर्म पूर्णपणे वाचा आणि डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी त्याची प्रिंट कॉपी ठेवा.